जालना/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील प्रतिष्ठीत नागरिक व पत्रकार असलम कुरेशी यांचे वडिल सलीम भाई कुरेशी यांचे शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता निधन झाले. ते 63 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे 4 मुले, 3 मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. हाजी नईम भाई कुरेशी व कय्युम भाई कुरेशी यांचे ते बंधु होते. त्यांचा दफनविधी शनिवारी सकाळी रांजणी येथे करण्यात आला.