गावातील युवा नेते योगेश देशमुख व उज्वल काळे यांनी विभाग नियंत्रक अमरावती यांना याबाबत विचारला जाब
अमरावती -दि.30/8/24 रोजी टाकरखेडा शंभू येथील विद्यार्थ्यांनी विभाग नियंत्रक एस टी महामंडळ अमरावती यांच्या कार्यालयात ठिया दिला व अमरावती ते टाकरखेडा येथे येणाऱ्या बसेसची अनियमितता, भंगार व नादुरुस्त बसेस मुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, रोज नियमित येणारी बस कधी कधी न येणे, या सर्व मागण्यांचे निवेदन विभाग नियंत्रक यांना दिले. याप्रसंगी विभाग नियंत्रक निलेश बेलसरे व DTO ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील,याची हमी दिली.
एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये व टाकरखेडा शंभू,,रामा, साहूर, देवरी व जळका या गावातील शेकडो विद्यार्थी,शेतकरी, महिला भगिनी अमरावतीला कामानिमित्त रोज ये जा करतात,त्यामुळे एसटी विभागाने नियमितता व शिस्त लावावी, असा सूचना प्रकाश साबळे यांनी एसटी विभागाला दिला.
याप्रसंगी योगेश देशमुख, शेखर अवघड, उज्वल काळे, यश जवंजाळ, साक्षी काळे, समर्थ टेकाडे, अभिजीत मुळे, गायत्री बोंडे, आयुष पाटील, यश हाते, खेडकर, विशाखा टेकाळे, ओम पिंगळे, आदित्य वाकोडे, प्रतिक भुरे, राजेश तायडे व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.