चंद्रपूर : रोज बुधवारला महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या सूचनेनुसार ,वैद्यकीय अधीक्षक,यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मां.जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, चंद्रपूर तसेच ए.आर.टी. केंद्र,वरोरा व विहान केअर अँड सपोर्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ए.आर.टी. केंद्र वरोरा येथील विभागात एच.आय.व्ही. सह जगणाऱ्या व्यक्ती साठी सामाजिक संरक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मां.ड्रॉ. प्रफुल खुजे , वैद्यकीय अधिक्षक, उप जिल्हा रुग्णालय वरोरा तर प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक मधुकर काळे नायब तहसीलदार, वरोरा तसेच जोसेफ दोमाला ,प्रकल्प संचालक केअर अँड सपोर्ट चंद्रपूर, वंदना विनोद बरडे अधिसेविका,उप जिल्हा रुग्णाल वरोरा, डॉ श्रीकांत जोशी वैद्यकीय अधिकारी ए.आर.टी. विभाग वरोरा तसेच संगीता देवाळकर (प्रकल्प व्यवस्थापक, विहान) त्याच प्रमाणे निकलेश चौधरी,(प्रकल्प समन्वयक, विहान ) यांची उपस्थिती होती.
आजच्या कार्यक्रमाचा माध्यमातून मा. अधिकारी यांनी रुग्णांना सोईस्कर होईल या करिता ए.आर.टी. विभागातच कॅम्प घेण्याबाबत सांगितले आणि वरोरा तालुका अंतर्गत सर्वच इच्छुक लाभार्थ्यांना योजना घेण्या संदर्भात आव्हाहन केले.पुढील महिन्यात कॅम्प घेणाबाबत अधिकारी यांनी सुचविले.
शिबिराचे सूत्रसंचालन एआरटी समुपदेशक प्रमोद म्हशाखेत्री तर कार्यक्रमाचे आभार एआरटी चे समुपदेशक परवीन खान यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरोरा ए.आर.टी. सेंटर वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत जोशीं यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजना साठी ए.आर.टी येथील सर्व कर्मचारी, विहान प्रकल्पाचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे परिश्रम घेतले. मार्गदर्शन शिबिरात एच.आय.व्ही. सह जगणाऱ्या व्यक्तीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.