शेवती गावातील शेतकऱ्यांना पिक विमा व कृषी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांना न्याय न मिळाल्यास सर्व शेतकऱ्यांना घेऊन उपोषणाला बसू - प्रकाश साबळे यांचा कृषी प्रशासनाला इशारा.
शासकीय अनुदान पासून वंचित व कृषी विभागाच्या लापरवाहीमुळे शेवती गावातील गारपीटग्रस्त शेतकरी माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वामध्ये दि. 23/8/24 कृषी कार्यालयावर धडकले.
अमरावती : मार्च 2024 मध्ये शेवती गावात व परिसरात गारपीट झाल्यामुळे संत्रा, आंबा, गहू,कांदा,कापूस व हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले,कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले असावे असा समज शेतकऱ्यांना झाला. मागील वर्षीचा पिक विमा भरला असताना सुद्धा झालेल्या नुकसानीमुळे विमा कंपनीने पिक विमा धारक शेतकऱ्यांना अपात्र केले,त्यामुळे शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली.परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय गाठून आपल्या संतप्त भावना अधिकाऱ्यां पुढे व्यक्त केल्या व यासंदर्भात जाब विचारला. आपली चूक लक्षात आल्यामुळे कृषी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन मेहरबान उपविभागीय अधिकारी कृषी यांच्या देखरेखीखाली पुन्हा सर्वे करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी दिले.
गारपीटग्रस्त शेवती गावातील शेतकऱ्यांनी अपात्र केलेल्या पिक विमा धारक शेतकऱ्यांना अनुदान व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या आर्थिक साह्य त्वरित करावे अन्यथा उपोषणाला बसू असा निर्वाणीचा इशारा शेतकऱ्यांनी कृषी प्रशासनाला दिला.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, कृषी उपसंचालक आगरकर, तालुका कृषी अधिकारी इंगोले, परिसरातील सर्व कृषी सहाय्यक,, मंडल कृषी अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व गारपीटग्रस्त शेतकरी यावेळी उपस्थित होते...