पुणे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
पुणे : देवांग कोष्टी समाज, पुणे ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. 15 ऑगस्ट 2024 रोजी संस्थेचे अध्यक्ष भगवान गोडसे यांनी देवांग हॉस्टेल, चौंडेश्वरी मंदिर, पिंपळे निलख, पुणे येथे आयोजित केली होती. या सभेला अंदाजे 400 चे पेक्षा जास्त सभासद व समाज बांधव उपस्थित होते. या सभेत विषय पत्रिकेनुसार मागील कार्यकारिणी / विश्वस्त यांनी राजीनामे दिल्याने नव्याने विश्वस्त निवड करण्याचा विषय घेण्यात आला. सर्वसाधारण सभेने श्री. अरुणराव वरोडे यांना नव्याने विश्वस्त निवड करण्याचा अधिकार दिला.
वरोडे यांनी उपस्थित सभासद व समाज बांधव यांचे संमतीने विश्वस्त निवड केले. सर्व नवनियुक्त विश्वस्त यांचे नावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली. या सभेला माजी अध्यक्ष, सुरेश तावरे व पदाधिकारी उपस्थित होते.
नवनियुक्त विश्वस्त यांचेतून पदाधिकारी निवड करण्याची तरतूद संस्थेचे घटनेत असल्याने दि. 23 ऑगस्ट रोजी झालेल्या सभेत मल्हारराव ढोले यांची एकमताने अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष श्री. ढोले यांनी अन्य पदाधिकारी निवड केले त्यात 1). विजयराव नडे (कार्याध्यक्ष) 2) रोहिदास वारे (उपाध्यक्ष) 3) बालाजी बोत्रे (सचिव) 4) गणेश टेके (सहसचिव) 5). शिवाजी वाघुंबरे (खजिनदार) 6) रमाकांत असलकर (सहखजिनदार) तसेच घटनेतील तरतुदीप्रमाणे तज्ञ् व्यक्तीस विश्वस्त नेमता येत असल्याने कायदेशीर सल्लागार ॲड. सचिन देवांग (टकले) यांची विश्वस्तपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष मल्हारराव ढोले यांनी संस्था व समाजाचे नावाला व उंचीला साजेसे काम सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन करेल. सभासद, समाज व हितचिंतक यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करेल अशी भावना यावेळी व्यक्त केली. पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सकल कोष्टी समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न करून नावीन्यपूर्ण समाजाभिमुख उपक्रम राबविले जातील असेही त्यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले. नवनियुक्त विश्वस्त यांनी यावर्षी होणाऱ्या 42 व्या भव्य वधू - वर परिचय महामेळाव्याचे देणगी मूल्य 500/- (पाचशे) करून समाजाला लगेचच सुखद अनुभव दिला.