दिघी महल्ले मध्ये काँग्रेसला मोठा झटका

 




 दिघी महल्ले येथील काँग्रेस कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश



 तालुका प्रतिनिधी अजय डाखोरे

धामणगाव रेल्वे- धामणगाव रेल्वे तालुक्या तिल दिघी महल्ले येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्याचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला. 

धामणगाव मतदार संघ चे विकासाचे वादळत निर्माण करणारे व लोकप्रिय आमदार प्रताप अडसड यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून दिघी महल्ले येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. काँग्रेस कार्यकर्त्याला विचारले असता आमदार प्रताप अडसड यांची विकासाची यशोगाथा सांगितली सत्तर वर्षात जे पानंद रस्ते झाले नाही ते दोन वर्षाच्या कालावधीमध्ये प्रताप दादांनी करून दाखविले. आमच्या गावात हर घर में नल ही योजना आणली.



       सिमेंट रस्ते, पी एम किसान योजना, लाडकी बहीण अशा अनेक योजना प्रताप अडसड यांनी धामणगाव मतदार संघात अनेक कामे राबवल्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे. सुरेश खडसे, गजानन खडसे, विशाल खडसे सचिन लांडगे आकाश तेलंगे ,मयूर महाजन, गौरव खडसे राजेंद्र, खडसे ,निलेश पंचारे, खंडारे असे अनेक कार्यकर्त्यांनी डॉक्टर अर्चना अडसड ( रोटे) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला . यावेळी भारतीय जनता पक्षाचे संजय गांधी निराधार चे अध्यक्ष राजू काळे ,रंगारी, बुत प्रमुख ,शेळके असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post