आता मुलींना मातोश्री शाळेत मिळणार स्वसंरक्षणाचे धडे
धामणगाव रेल्वे -मातोश्री के .जी. एस. इंटरनॅशनल स्कूल ऑफ ओनर्स या शाळेमध्ये पहिल्यांदाच कराटे प्रशिक्षण घेत आहे जुना धामणगाव येथील मातोश्री कमलादेवी घेवरचंदजी सिंगवी इंटरनॅशनल स्कूल ऑफ ओनर्स मध्ये पहिल्यांदाच मुला मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देत आहे तालुक्यातील कराटे सांस्कृतिक रुजून तरुणांमध्ये आत्मरक्षण व नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी कराटे प्रशिक्षण आवश्यक आहे आजच्या घडामोडी मध्ये मुलीवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे ते प्रमाण रोखण्यासाठी मुलींना स्वतःचं संरक्षण करणे गरजेचे आहे त्यासाठी त्यांना कराटेचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे.
अशाच एका शाळेमध्ये मातोश्री शाळेमध्ये कराटे ट्रेनिंग देत आहे त्यामध्ये त्यांना स्वतःचं संरक्षण करणे व तलवारबाजी, नान चाकू ,लाठीकाठी अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षण देत आहे या उपक्रमासाठी शाळेची व्यवस्थापकीय संचालक दीप्तीश सिंगवी यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभलेले आहे व मुख्य कराटे प्रशिक्षक सचिन मून ब्लॅक बेल्ट 3rd दान तसेच शाळेची मुख्याध्यापिका सुनीता देशमुख यांच्यासोबत शिक्षिका अंकिता ठाकरे श्वेता अलोणे, अर्चना वाघोडे ,सुजाता मोरे, सुवर्णा गावंडे, सविता साळुंके, कल्याणी पत्रे, शुभांगी सोनवणे, उन्नती आठवले ,सुनीता मेश्राम, दिपाली शिर्के, स्नेहल सिरस्कार, मनीषा मांडवकर, वैशाली पाटील, व शिक्षक अनंत मावळे ,राजेश दगडकर, भूषण उयके व भूषण मांडले,या सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षिके कर्मचारी गण यांनी सहकार्य केले व या कराटे प्रशिक्षण ला सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते...