डोंबिवलीतील कोष्टी समाज सेवा मंडळाचे३६वे वार्षिक स्नेहसंमेलन व सर्व साधारण सभा उत्साहात संपन्न

 




डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-स्नेहबंधनाचा उत्साही समारंभ म्हणजे कोष्टी समाज सेवा मंडळाचे३६वार्षिक स्नेहसंमेलन.गेली कीत्येक वर्ष कोष्टी समाज बांधव गुण्यागोविंदाने डोंबिवली येथे रहात आहेत.कोष्टी समाज सेवा मंडळ३६वर्ष कार्यरत आहे.त्याच अनुषंगाने नुकताच मंडळाची सर्व साधारण सभा व वार्षिक स्नेहसंमेलन शुभमंगल कार्यालय,रेल्वे स्टेशन जवळ,डोंबिवली(पुर्व)येथे उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरूवात चौंडेश्वरी देवीच्या प्रतिमेची पुजा व आरती करुन झाली.कार्यक्रमास सौरभ मराठे(सी.ए.)यांनी धर्मादाय संस्थेने कसे काम करावे,देणगी देणा-यांनी८०जी अंतर्गत कसा उपयोग करावा तसेच इनकम टॅक्स संदर्भात विशेष मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे अॅड.सचिन देवांग यांनी कोष्टी समाजाने कशी प्रगती करावी आणि कोष्टी समाजासाठी मार्गदर्शक तत्वे या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले.अॅड.सचिन देवांग हे अनेक नामांकीत शैक्षणिक व धर्मादाय संस्थांचे कायदेशीर सल्लागार आहेत.त्यांनी मंडळास पाच हजार रुपयांची देणगी दिली.त्यांनी मंडळास गरज लागल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले.विशेष अतिथी आर्किटेक्ट सौ.अनुजा वाव्हळ यांनी वास्तुशास्त्र,अंकशास्त्र,रेकी इत्यादी बाबत सविस्तर माहिती सांगितली.मुलांमध्ये पाॅझिटीव्ह एटीट्युट रुजवला पाहिजे असे आग्रहाने सांगितले.याप्रसंगी अनिल वाघ यांनी दोन सुश्राव्य गाणी सादर केली.तसेच मुला-मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.मंडळाच्या अध्यक्षा सौ.अनिता वाघावकर यांनी समाज बांधवांनी अशा स्नेहसंमेलनात जास्त प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन केले.तरुण पिढीने सहभाग घ्यावा,तरच मंडळ पुढे व्यवस्थित कार्यरत राहिल व आपल्या समाजातील तरुण मंडळींना समाजाबद्दल ओढ निर्माण होईल हे आवर्जून सांगितले.अहवाल व मागिल सभेचे इतिवृत्त वाचन सचिव सौ.जयश्री रोकडे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांची ओळख दत्ता कडुलकर यांनी करुन दिली.विद्यार्थी गुणगौरव समारंभ शशिकला दिवटे यांनी सादर केला.सुत्रसंचालन व प्रास्ताविक मिलींद रोकडे यांनी केले.आभार राजन बुचडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.शिल्पा वाव्हळ,सौ.कविता तारळकर,प्रशांत खोचे आदींनी विशेष परिश्रम घेतले.मंडळाकडुन उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post