अमरावती,चांदूर रेल्वे - महा. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात यशस्वी पणे राबविल्या जाण्यासाठी शासकीय स्तरावर समिती ची स्थापना करण्यात आली आहे. या समिती मध्ये जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांची महा. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने तसेंच मा.केंद्रीय मंत्री शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, शिवसेना राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या मार्गदर्शनात तसेंच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार, शिवसेना दमदार जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कटियार यांनी धामणगाव विधानसभा क्षेत्रात शिवसेना शहर प्रमुख गोलू उर्फ सागर यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त समिती सदस्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणी युवा सेना जिल्हाप्रमुख प्रविन दिधाते यांचे विशेष आभार मानले. तसेंच संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पदाधिकारी यांचे कडून सर्वांचे अभिनंदन होत आहे..