जि.प.उच्च प्राथमिक शाळा, कलगाव ता.महागाव जि.यवतमाळ येथे भाऊ..बहीणीचा पवित्र असा रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात संपन्न केला सर्व प्रथमकार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र तुमस्कर सर शिक्षक सर्वश्री..साहेबराव भांगे, रमेश पवार, गजानन खराटे, चंद्रभान येरवाळ, शिवशंकर पंचपुत्रे, बाबासाहेब आचार्य, शिक्षणप्रेमी प्रितम खंदारे सर यांना राखी बांधून त्यानंतर सर्व लाडक्या बहीणीनी आपल्या सर्व लाडक्या भावांना राखी बांधून सण साजरा केला यावेळी सर्व लाडक्या बहीण भावांना खाऊवाटप करण्यात आले.