अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक वही-एक पेन चे वाटप

 






 नाशिक विंचूर  : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने विंचूर येथील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना एक वही - एक पेन चे वाटप करण्यात आले यावेळी समितीचे मुख्य निमंत्रक अॅडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंढे, रोहीणी जाधव (पाली भाषा तज्ञ, संचालक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर नाशिक), सचिन दरेकर (सरपंच विंचूर ग्रा. पा.), निलेश दरेकर, सुरेश खरात, शरद साठे, दशरथ शिरसाठ, नाना साळवे, मंगेश शिरसाठ, रेखा ताई जाधव, सुनीताताई लोंढे, संतोष शिरसाठ आदि मान्यवर उपस्थित होते. रोहीणी जाधव यांनी आण्णा भाऊ साठे जयंती निमित्ताने मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन दिपक शिरसाठ, किशोर पाचरणे, कैवल्य जगधने, राहुल ईस्ते, नितीन थोरात, वाल्मिक ईस्ते, गोरख पारधे, दत्तु बकुरे, सागर कांबळे, दिपक कांबळे, सचिन निकाळे, नंदु शिरसाठ, सागर शिरसाठ, अशोक नेटारे, सोना नेटारे, रोहिदास नेटारे, ऋषी नेटारे, रमेश नेटारे, किशोर नेटारे, अमोल सोनकांबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी शाळेतील मुख्याधिपिका व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post