उदगीर : सन्मान कर्तृत्वाचा, सन्मान नारीशक्तीचा या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपक्रमशील पुरस्कार नुकतेच रघुकुल मंगल कार्यालयात प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक व बंदरे, मंत्री संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते हा उपमुख्यमंत्री नारीशक्ती सन्मान २०२४ हा पुरस्कार स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या सचिव, पोलीस महिला दक्षता समितीच्या अशासकीय सदस्या तथा महात्मा पब्लिक इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका संचालिका प्राचार्या सौ.संगिता दिपक नेत्रगावे-पाटील यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अफसरबाबा शेख, जिल्हा नियोजन समितीचे अशासकीय सदस्य प्रा.डॉ.श्याम डावळे, अभिजीत औटे, ॲड.दिपाली औटे हे उपस्थित होते.
त्यांच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान द्वारा संचलित महात्मा पब्लिक इंग्लिश स्कूलचे प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक नेत्रगावे-पाटील, इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या तथा संस्थापक संचालिका सौ.एस. दीपक नेत्रगावे-पाटील, शाळेचे प्राचार्य आनंद चिंचोले, प्ले ग्रुप विभागाच्या शिल्पा सांगवे, नर्सरी विभागाच्या दीक्षा कांबळे, स्वाती चिंचोले, एलकेजी विभागाच्या शिवकन्या वाघमारे, अश्विनी केंद्रे, युकेजीच्या जयश्री घोंगडे, पांचाळ मावशी, गौतमा मावशी, कर्मचारी रावण भोसले उदगीरकर, सुनील गणपतराव कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, पालकातून कौतुक व अभिनंदन होत आहे.