बदलापूर (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
उल्हास प्रभात वृत्तपत्राचा यावर्षीचा ३० वा दीपावली विशेषांक लवकरच पुस्तक रूपाने आकर्षक स्वरूपात प्रसिद्ध होणार असून त्यासाठी साहित्यिकांनी विविध प्रकारचे अप्रकाशित साहित्य उदाहरणार्थ लेख, कथा, कविता, मेनू, आरोग्य विषयक माहिती, सौंदर्य विषयक माहिती, विनोद, व्यंगचित्रे, किचन टिप्स, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, थंड हवेचे ठिकाणे आदी प्रकारचे साहित्य दिनांक १५ ऑगस्टपर्यंत मिळेल अशा बेताने सुस्वच्छ हस्ताक्षरात किंवा टंक लिखित कागदाच्या एकाच बाजूस लिहून पाठवावे. असे आवाहन उल्हास प्रभातचे संपादक डॉ. गुरुनाथ बनोटे यांनी केले आहे.
पत्ता : संपादक उल्हास प्रभात c/o सौरभ बनोटे, ६०३ सचिनम कॉ ऑप हाऊसिंग सोसायटी गावदेवी बदलापूर (ईस्ट), तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे. पिन कोड 421503.