जेणे करुन महिला वर्ग पुरुष वर्ग व तरुण युवक यांच्या आरोग्याला धोक्यापासून आरोग्याला वाचवण्यासाठी भीम ब्रिगेड संघटनेकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन..
विशेष प्रतिनिधी राजाभाऊ वानखडे
अमरावती : जिल्ह्यात व अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री अवैद्यरित्या होत आहे.
यामध्ये महिला वर्ग ही सुध्दा गुटख्याच्या अधिन गेल्या असुन महिलामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे.
काही महिलांना गुटख्या पासून कॅन्सरच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे. तसेच ग्रामीण व शहरामध्ये जर पाहले तर कित्येक महिला ह्या पानबहार, ९०००, विमल व बाजीराव, तलब, पानपराग, चिखली, विकली इत्यादी पुड्या विकल्या जाते.
यामध्ये तरुण युवक हे गुटक्याच्या अधीन झाले असुन त्यांचे जबडे सुध्दा खुलत नसून त्यामुळे कित्येक तरुण युवा वर्गाला गुटक्यामुळे कॅन्सरच्या दरात उभे राहणे शक्य होत आहे.
अमरावती शहरामध्ये प्रत्येक पानठेल्यावर प्रत्येक चाय टपरीवर व प्रत्येक किराणा दुकानामध्ये गल्ली बोळ्यात अवैधरित्या गुटका छाती ठोकपणे गुटका विकल्या जात आहे.
त्याच बरोबर अमरावती शहरात व जिल्हयामध्ये एम डी चे प्रमाण सुध्दा वाढले असुन यामुळे तरुण युवा वर्ग हे आई वडिलांना मारझोड करुन पैसे घेवून आपल्या सवयीचा गुलाम झाला आहे.
त्याकरीता आपणास निवेदनाद्वारे विनंती आहे की, आठ दिवसामध्ये वरील गुटका एम डी विक्रीवर प्रतिबंध घालावा व लोकांच्या स्वास्थास सहकार्य करावे.
असे न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्या दालनात गुटका फेकण्यात येईल व जिल्हाधिकारी कार्यालया समोर गुटख्याची होळी करण्यात येईल..
करीता आपण तात्काळ गुटका बंदीचे आदेश द्यावे.भीम ब्रिगेड संघटनेकडून देण्यात आले.