मानवधिकार परिषदचे अधिकारी सांगून उकळले 15 लाख

 


 

      शेती व्यवहारातून वृद्धाची फसवणूक....



अमरावती, चांदूररेल्वे : चांदूररेल्वे मिलींद नगर येथील शेतकरी संजय नंनोरे वय ६० वर्षीय वृध्दाची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे अधिकारी सांगून शेतीच्या व्यवहारातून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे..

शेतकरी संजय उर्फ सतिश नंनोरे यांना आरोपी अनिल बन्सीलाल राठोड (३५)रा.चांदूर रेल्वे, संदीप दादाराव राठोड (४०)रा.पोहरा, या दोघांनीही मानवधिकार परिषदचे अधिकारी असल्याचे सांगून १७ फेब्रुवारी २०२३ ते २० जून २०२४ पर्यंत शेतीच्या व्यवहारातून तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ४२०,४१९,४१७,१७०,५०४,५०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे..

Post a Comment

Previous Post Next Post