विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
नांदेड,किनवट : नंदगाव ता किनवट येथे डॉ.ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदगाव अखिल भारतीय परीवार पार्टी चे हिंगोली लोकसभा चे प्रभारी अनिल मोहिते भारतीय यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक जाधव , शिक्षक गुळवे, उत्तम शेळके, प्रकाश डुकरे, पत्रकार दशरथ आंबेकर सह शाळेतील शिक्षक विद्यार्थी पालक वर्ग शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या फोटो ला प्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या वेळी उपस्थित सर्व गावकऱ्यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला..