अमरावती:- अमरावती सांस्कृतिक भवन येथील आयोजित कार्यक्रमात सिद्धांत सुनिल डेहणकर हा ज्ञानमाता हायस्कुल अमरावती चा विद्यार्थी असून त्याने दहावी ला 90% गुण मिळवून सायन्स विज्ञान व इंग्रजी विषयात प्राविण्य प्राप्त केले .
नेरपिंगळाईच्या प्राथमिक शाळे मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने ज्ञानमाता हायस्कुल अमरावती येथे प्राविण्य मिळविल्या मुळे त्याचा सांस्कृतिक भवन अमरावती येथे माजी खासदार नवनित राणा व आमदार रवि राणा यांनी त्याचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्याचा त्याचे पालकांसोबत सत्कार केला या प्रसंगी सोनाली नवले माजी सदस्या पं. सं . ह्या उपस्थित होत्या त्यांनी सिद्धांतचे अभिनंदन केले.