स्थानिक नेरपिंगळाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा येथील सोलार पॅनल गेल्या आठ महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे.त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक यांनी स्थानिक ग्रामपंचायत नेरपिंगळाई येथील सरपंच सविता खोडस्कर यांना वेळोवेळी या बंद असलेल्या सोलार पॅनल विषयी कळविले असता ग्रामपंचायत कडून कुठलीही दखल न घेता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
आणि आता तर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळणेही कठीण झाले आहे.सोबत पंखे असूनही ते बंद अवस्थेत आहे,प्रार्थना वा कार्यक्रमही बंद लाऊडस्पिकरच्या आवाजात घ्यावी लागते.शाळेमध्ये विद्यार्थी संख्या मोठया प्रमाणात असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे या सर्व समस्येबद्दल स्थानिक ग्रामपंचायतला कळविले असता ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे कुठलीही समस्या सोडविण्यात आली नाही.
त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होतांना दिसून येत आहे.याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोष सरपंच व ग्रामपंचायत वर असताना दिसून येत आहे.