धनगर अधिकारी व कर्मचारी तृतीय अधिवेशात वंदना बरडे अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या यांचा सत्कार

 



गावाकडची बातमी - दिनांक ७ जुलै २०२४ ला अमरावती येथे महाराष्ट्राचे लेव्हलचे धनगर अधिकारी व कर्मचारी यांचें तृतीय अधिवेशन उत्साहात पार पडले.

   या कार्यक्रमाला महाराष्टातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

नवनिर्वाचितांचा सत्कार,१०,१२ , पदवी व पदवीत्तोर, सेवानिवृत्त,तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांचें सत्कार करण्यात आले.




   त्यामध्ये वंदना विनोद बरडे अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या, धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या सदस्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती महीला मंडळ अध्यक्ष सौभाग्य नगर नागपूर यांच्या राष्ट्रीय प्रतीभा सन्मान मिळाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला.

 



 या कार्यक्रमासाठी अनिलकुमार ढोले धनगर अधिकारी कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष,शरद उरकुडे महासचीव,नलीनी ढोले महीला अध्यक्ष, प्रविण लांडे, प्रवीण भागवत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post