दैनिक हिंदुस्थानचे संपादक श्री उल्हासराव मराठे यांची माणसं जोडणारी भूमिका अनुकरणीय अभिष्ठचिंतन प्रसंगी समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड

 



     विशेष प्रतिनिधी राजाभाऊ वानखडे 

अमरावती : स्थानिक दैनिक हिंदुस्थानचे संपादक श्री उल्हासराव मराठे यांचे वाढदिवसानिमित्त नुकतेच स्नेहीजनांकडुन अभिष्ठचिंतन करण्यात आले.

    वऱ्हाड विकास चे वतीने सत्कार व अभिष्ठचिंतन करुन शुभेच्छा देतांना समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड म्हणाले पत्रमहर्षी स्व. बाळासाहेब मराठे व डॅा. अरुणदादा मराठे यांनी पत्रकारीतेला समाज प्रबोधनाचे माध्यम समजुन गेल्या ५० वर्षापूर्वी ग्रामिण स्तरावरील युवकांना वृत्तसंकलन व पत्रकारीतेसाठी प्रोत्साहीत केले.

     त्याच आदर्श मुल्यांचा संपादक या नात्याने उल्हासराव मराठे हे गेल्या २ तपापासून वसा चालवित असून त्यांनी आपल्या लेखणीला शासन – प्रशासन व श्रीमंतांची दासी होवू दिले नाही त्यांनी विधायक कार्याचे कौतुक व जनसामान्यांवर अन्याय करणाऱ्या शासन प्रशासनाच्या भूमिकेवर सडेतोड शब्दात प्रहार करण्याचा बाणा जपला. असे सांगून त्यांनी सर्वच जाती, धर्म, पंथ व राजकीय पक्षातील अनेकांसोबत स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित केले. त्यांची ही माणसं जोडणारी भूमिका अनुकरणिय असल्याचे म्हटले. ” 

या प्रसंगी उल्हासराव मराठे यांनी गतकाळातील स्मृतींना उजाळा दिला. 

त्यांचे सर्वश्री श्रीकृष्ण जोगळेकर, डॅा. पद्माकर सोमवंशी, डॅा. गणेश खारकर, प्राचार्य मधुकर आमले, डॅा. नंदकिशोर मुरके सह अनेक स्नेहीजनांनी अभिष्ठचिंतन करुन पत्रकारीतेच्या भावी प्रवासाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॅा. रविंद्र मराठे,ज्योतीताई मराठे,स्नेहल मराठे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post