शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कामगार, गरजू जोडप्यांनी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा... येत्या 20 जुलै या तारखे पर्यंत कागदपत्रे जमा करावी.
अमरावती : शेतकरी, शेतमजुर, गोरगरीब, कामगार, कष्टकरी, तथा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आंतरजातीय, इतर मागासवर्गीय समाजाच्या मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी पालक लाखो रुपये खर्च करत असतात.
पालकांना लग्नासाठी कर्ज बाजारी व्हावे लागते. व आयुष्यभर व्याज व मुद्दल भर-व्यासाठी काम करावे लागते. व्याजाचे पैसे न भरल्यामुळे सावकारांच्या त्रासा मुळे आई वडीलां वर आत्महत्याची पाळी येते.
पालकांवर अशी वेळ येऊ नये त्या करिता शासनाच्या सामाजिक न्याय विभागा तर्फे कन्यादान योजने अंतर्गत व आंतर जातीय योजने अंतर्गत साहित्यसम्राट अन्नाभाऊ साठे बहु. शैक्षणीक मंडळाच्या वतीने ९ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व धर्मीय व आंतरजातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. सामूहिक विवाह सोहळ्याचे सर्व खर्च, मंगल कार्यालय, जेवन, व्हिडिओ शूटिंग, बैंड बाज्या ही व्यवस्था संस्थेच्या वतीने केली जाणार आहे.
या भव्य विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस तथा विशेष उपस्थिती अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटिल यांची मुख्य उपस्थिथि लाभणार असून स्थानिक आमदार,खासदार यास बरोबर अमरावती शहरातील व जिल्ह्यातील जेष्ट समाज सेवक, राजकीय नेते सुध्दा उपस्थित राहणार असून उपस्थित पाहून्यांच्या वतीने विवाहित जोडप्यांना आकर्षित गिफ्ट व साड़ी-चोळी देण्यात येइल. व उपस्थित प्रमुख पाहुने यांच्या व राजकीय नेत्यांच्या वतीने विवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यात येइल.
तरी ज्या उप वर वधुनां विवाह करायचा असेल त्यांनी विवाहची नोंद करण्यासाठी कागदपत्रे मुला-मुलीची टी.सी., जातीचा दाखला, डोर्मेसीयल सर्टिफिकेट, रहिवाशी दाखला, प्रथम विवाह प्रणाम पत्र व बालविवाह प्रतिबंधक प्रतिद्या लेख या कागदपत्रांची आवश्कता आहे.
वधुच्या पालकांच्या बँक खात्यात २०,०००/- विस हजार व आंतरजाती विवाह जोडप्यांना ७०,०००/- चे अनुदान दिल्या जाइल. व संस्थे तर्फे लग्नाचे प्रणाम पत्र दिल्या जाइल तरी ज्यांना सामूहिक विवाह सोहळ्या मध्ये लग्न करायचे असेल त्यांनी दिनांक 20 जुलै या तारखेच्या आत सर्व कागद पत्रे डॉ.रुपेश खडसे मोटर ड्राइविंग स्कुल, प्रभादेवी मंगल कार्यालय ऍम.आय.डी. सी. रोड जुना बायपास अमरावती येथे जमा करावे.
आधिक माहिती करीता डॉ. रुपेश खडसे मो. 7350712852, पंकज जाधव मो. 9921560309, 8830283044 यांना संपर्क साधावा..