लोअर परेल वरळी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून गाडगेबाबा आश्रम शाळेत शालेय साहित्य वाटप..!

 


भिवंडी (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

वज्रेश्वरी (भिवाळी) येथील संत गाडगेबाबा आश्रम शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कै.वसंत देऊ पाटकर यांच्या स्मरणार्थ लोअर परेल वरळी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व शालेय साहित्य वाटप रविवार दिनांक १४, जुलै,२०२४ रोजी संस्थेच्या सहयोगातून व समाजसेवक प्रकाश पाटकर यांच्या आयोजनातून सरकारी वकील दीनानाथ वालावलकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा व सहाशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

लोअर परेल व वरळी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटकर व त्यांच्या सोबतचे अनेक सहकारी हात यांच्या सहयोगाने दरवर्षी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जात असतो याही वर्षी सदर सन्मान सोहळा,शालेय साहित्य वाटप केले,मोठ्या प्रमाणात पाऊस असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गाडगेबाबा आश्रम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थिती दर्शवली शाळेचे संचालक मा.अनिल आवटी यांनी शाळेची माहिती सांगत अनेक विद्यार्थी ह्या शाळेत घडले विविध पदावर सध्या ते कार्यरत आहेत, यावर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे असे सांगितले तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस असूनही हा कार्यक्रम होईल का नाही ही शंका होती परंतु एक वेळ पाऊस येणार नाही पण प्रकाश पाटकर साहेब येतील हा विश्वास मला होता आणि त्या अनुषंगाने पाटकर साहेब आले आणि शालेय साहित्य वाटप व सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे संपन्न झाला याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आदिवासी पाड्यांमध्ये ३४ वर्षापासून मदत करण्याचं काम करत असल्याचे प्रकाश पाटकर यांनी सांगितले व पुढेही हे कार्य असेच चालू राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, सद्गुरु वामनराव पै प्रणित जीवन विद्याचे प्रसारक सौ.भक्ती भडगावकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांकडून सद्गुरु वामनराव पै यांची प्रार्थना बोलून घेतली राष्ट्रासाठी आपले जीवन मोलाचं आहे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले व शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी आदिवासी गीत गायन व नृत्याकलेतून सर्वांना आनंदित केले,सरकारी वकील दीनानाथ वालावलकर यांनी शिस्त, स्वच्छता व सातत्य जीवनात महत्त्वाचे आहे असे सांगत जीवनात शिक्षण घेऊन यशस्वी व्हाल अशी अपेक्षा त्यांनी मुलांकडे व्यक्त केली,उपस्थित पाहुण्यांचा सन्मान क्रण्यात आला साहित्य वाटप करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या एन.एस.एस. डहाणूकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रकाश पाटकर (अध्यक्ष-महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ,समाजसेवक)

 प्रकाश पाटकर यांच्या मातोश्री सुंदराबाई पाटकर, प्रमुख पाहुणे ॲड.दीनानाथ वालावलकर 

(मुंबई हायकोर्ट सरकारी वकील),

अनिल आवटी (संत गाडगे महाराज संस्थान चे संचालक),

विजय पवार (समाजसेवक),

जगन्नाथ कामत(समाजसेवक, आनंद भवन हॉटेलचे मालक),

गणेश परब (शारदा कॅम्पुटर चे मालक). डॉ.सूर्यभान डोंगरे (आयुर्वेद महाविद्यालय शिव मुंबई विभाग प्रमुख प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ) रेवती कृष्णा (सेंट्रल बँक मॅनेजर) ॲड.सुनील शिर्के(शिर्के फाउंडेशनचे अध्यक्ष,संस्थापक)

प्रकाश यादव (साईभक्त, समाजसेवक), राजा मयेकर (जेष्ठ पत्रकार) विलास गवस (समाजसेवक) शशिकांत सावंत (पत्रकार,कवी) आण्णासाहेब आहेर (पत्रकार) विलास देवळेकर (कवी, साहित्यिक) छाया सिताराम गचके (समाजसेविका, योग शिक्षिका) साध्वी दिगंबर डोके (एम एस डब्ल्यू कौन्सलर), संतोष पाटकर,रवींद्र नानचे,सागर सातवते यांच्या उपस्थिती सह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहयोगात सोहळा सुंदर आयोजनात संपन्न झाला,कवी,साहित्यिक विलास देवळेकर यांनी रचित राष्ट्रभक्ती गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post