नेरपिंगळाई प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांचि मागणी

 



   सरपंच सविता खोडस्कर यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन


(मोर्शी)प्रतिनिधी प्रमोद घाटे/प्रविण पाचघरे :- नेरपिंगळाई महिला डॉक्टर च्या मृत्यू नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात पद रिक्त असल्याने तात्काळ कायमस्वरूपी डॉक्टर देण्या चि मागणी नेरपिंगळाई ग्रामपंचायत च्या सरपंच सविता खोडस्कर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे निवेदन देऊन मागणी केली 

नेरपिंगळाई हे गाव परिसरात सर्वात मोठे गाव असून या गावावर आजूबाजूचि जवळ जवळ पंचवीस खेडी अवलंबून असल्याने शासना नी गेल्या काही वर्षा पूर्वी गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून दिले मात्र हे आरोग्य केंद्र समस्यांन चे माहेर घर असल्यानी काही दिवसा पूर्वी या आरोग्य केंद्रा मधल्या महिला डॉक्टर चा राहत्या कॉर्टर मध्ये मृत्यू झाला आणि आणखी समस्ये मध्ये भर पडली पद रिक्त असल्या ने व कार्यरत असलेले डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने गावातील रुग्ण वाऱ्या वर प्रस्तुती करिता येणाऱ्या महिलांना एक से आठ बोलावून अमरावती किंवा मोर्शी चि वाट धरावी लागत असल्याने याची दखल घेऊन व रुग्नकल्याण समिती प्रमुख म्हणून नेरपिंगळाई च्या सरपंच सविता खोडस्कर यांनी पुढाकार घेऊन अमरावती येथील जिल्हा आरोग्य अधिकारी आसोले साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी. व आमदार यशोमती ठाकूर यांच्या कडे निवेदन देऊन कायम स्वरूपी डॉक्टर देऊन कार्यरत डॉक्टर यांना मुख्यालई राहण्याचा आदेश देण्याचि मागणी केली या वेळी सविता खोडस्कर सरपंच, रमाताई इंगळे ग्रामपंचायत सदस्य, निलेश पांडे रुग्ग्नकल्याण समिती सदस्य, सचिन बरडे ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते डॉक्टर लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या वेळी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post