बुलढाणा : डॉ. संजीवनी बिहाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून "महिला न्याय दरबाराचे उद्घाटन करून डॉ. संजीवनी बिहाडे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबतीत उमेदवारासंदर्भांत चर्चा केली.
विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या महिलांची यादी करून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस ला पाठविण्याचे ठरले.वेळेवर विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मंगलाताई पाटील होत्या, सत्कार मूर्ती संजीवनी ताई बिहाडे प्रमुख पाहुणे
मिनलताई आंबेकर जेष्ठ नेत्या महिला काँग्रेस ,नंदिनीताई टारपे सचिव म. प्र. म. काँग्रेस, प्रमिलाताई गवई मैडम मीराताई माळी तसेच या आढावा बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्याध्यक्ष, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी आपल्या कार्यकारिणीच्या महिलां उपस्थित होत्या.