वृत्तपत्र विक्रेते आयु. अशोक बागडे यांचे वाचन संस्कृती समृध्द करण्यात महत्वपुर्ण योगदान. – प्रा.श्रीकृष्ण बनसोड

 


माजी नगरसेवक सुरेश मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली शिवटेकडी येथे अभिष्ठचिंतन सोहळा संपन्न.


अमरावती – स्थानिक महानायक संघटना, वऱ्हाड विकास व फुले-शाहु-आंबेडकर संघटनांचे वतीने शनिवार दि.६ जुलै रोजी शिवटेकडी च्या पायथ्याशी वृत्तपत्र विक्रेते व एजंट आयु. अशोकराव बागडे यांचे ६६ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महानायक संघटनाचे प्रमुख व माजी नगरसेवक सुरेश मेश्राम हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आयु. अशोक बागडे यांच्या विविधांगी कार्यावर प्रकाश टाकला. 

 डॅा. आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.श्रीकृष्ण बनसोड हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक होते. “ वृत्तपत्र विक्रेते आयु. अशोकराव बागडे हे वृत्तपत्राच्या माध्यमातुन वाचन संस्कृती समृध्द करण्यात महत्वपुर्ण योगदान देत असून फुले-शाहु-आंबेडकरांचे सत्यशोधकीय विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यात समता सैनिकाचे भूमिका वठवित असल्याचे ते म्हणाले. ”

 पत्रकार  राजा वानखडे , ज्ञानेश्वर डोंगरे, देविलाल रौराळे, हरीश सुंदरवाने, शरफुद्दीन पठाण, बंडु मंडले, गजानन वानखडे, संजय गोंडाणे, प्रविण विघ्ने, वसीम काजी, प्रमोद शेंडे आदींनी आयु. अशोक बागडे यांचे अभिष्ठचिंतन करुन वृत्तपत्रीय व्यवसायाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन करण्यास उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गोलु बागडे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी दलीत-आदीवासी-ओबीसी व अल्पसंख्याक मधील अनेकांची उपस्थिती होती. असे पत्रकार राजा वानखडे कळवितात. 

Post a Comment

Previous Post Next Post