प्रतिनिधी /प्रमोद घाटे - माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै ला संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात साजरा करण्यात येतो अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघात सुध्दा तिवसा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले व कल्चर हायस्कूल येथे वृक्षारोपण करून महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला आसावरी देशमुख पच्छिम विदर्भ महिला आघाडी समन्वयक, विलास माहुरे तालुका प्रमुख,वृषाली इंगळे महिला आघाडी जिल्हा संघटिका, वैशाली उल्हे,आरती राठी,रूची राठी,मडगे ,केले ,शरद वानखडे,शरद इंगळे,आषिश माहोरे,समीर निंघोट, मोरेश्वर इंगळे, आमले , सचिन हटवार, दिनेश वानखेडे, देशमुख तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी चे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.