नेरपिंगळाई,प्रतिनिधी:- विदर्भाचे आराध्य दैवत आणि महाराष्टातील शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपिठ असलेल्या पिंगळादेवीच्या गडावर जाणाऱ्या गोराळा ते पिंगळाई रस्त्याचे काम अत्यंत कासवगतीने चालू असून पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था फार वाईट झाली आहे. भक्तांना गड्यातुन व चिखलातून चालावे लागत आहे या ठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहन गडावर नेता येत नाही नेल्यास अपघात होण्याची याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या रस्त्याचे काम नवरात्रीच्या आधी पुर्ण करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. पिंगळादेवी गडावर जाणारा मार्ग प्रचंड प्रमाणावर उखडला आहे भक्तांना सुरळीत चालता येत नव्हते त्यामुळे पिंगळादेवि गड रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला नागपुर येथील कंञाटदाराने सुरवातीला चांगल्या गतीने काम केले आता रस्त्यावर माती आणि मूरुम टाकल्यामुळे पावसळ्यात चिखल झाला असुन रस्त्यावर जनावरांना सुध्दा चालता घेत तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे..