अमरावती, राजाभाऊ वानखडे : भिमक्रांती सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अमरावती पश्चिम विभाग शहराध्यक्ष पदी हारून शेख चाँद यांची नियुक्ती सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी लालखडी,लायब्ररी चौक,अमरावती या ठिकाणी करण्यात आली. कार्यक्रमांमध्ये मुस्लिम समाज बांधव परिसरातील नागरिक शेख हारून शेख चाँद, मो.जाकीर भाई,शेख जाबीर भाई,शेख चाँदभाई,शवकत अली,शेख भुरु भाई,शेख रशीद भाई,अब्दूल रहेमान भाई,शेख सुलतान भाई,शेख अकील भाई,शेख आसीफ भाई,भिमक्रांती संघटनेचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य सागर मोहोड,जिल्हा कार्याध्यक्ष सुनील बनसोड,जिल्हा महासचिव प्रकाश गवई व राष्ट्रपाल घरडे यांच्या उपस्थितीमध्ये संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
यावेळी नियुक्ती बद्दल उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी आनंद व्यक्त केला सोबतच जास्तीत जास्त संख्येने आम्ही संघटनेमध्ये सामील होऊन मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये संघटनेच्या शाखा तयार करून समाजाच्या न्याय हक्कासाठी,वस्त्यांच्या स्वच्छता,आरोग्य व नागरिक सुविधा मिळवून देण्यासाठी काम करण्याचा संकल्प नवनियुक्त पश्चिम विभाग अमरावती शहर अध्यक्ष हारुण शेख चाँद यांनी व्यक्त केला आहे.