अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जवळा येथील महिला शेतकरी व महिला बचत गटातील कार्यकर्त्या प्रिया योगेश गोंडचवर यांना कृषी दिनानिमित्त कृषी विभाग अमरावतीचा जिल्हास्तरीय कृषी गौरव पुरस्कार प्रदान....
विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती जोशी सर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, जिल्हा कृषी विकास अधिकारी तोडकर साहेब व मान्यवर अधिकाऱ्यांच्या शुभहस्ते प्रिया गोंडचवर सन्मानित.
कृषी विभाग,अधिकारी व कर्मचारी वर्ग आमच्यासारख्या खेड्या गावामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करते, त्यामुळे आम्ही शेतकरी वर्ग प्रोत्साहित होतो, असे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी सुप्रिया गोंडचवर यांनी व्यक्त केले.
अमरावती जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात दिनांक एक जुलै 2024 रोजी कृषी दिनी जिल्ह्यातील 14 प्रगतशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
आत्मा या संस्थेच्या प्रकल्प संचालक निस्ताने मॅडम, कृषी अधिकारी अजय तळेगावकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सोळंके, कृषी अधिकारी टेकाडे व जवळा गावाचे माजी सरपंच भास्करराव गोंडचवर आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..