डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-ऑर्गनाझर-डायरेक्टर शर्मिला केसरकर यांचे सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य आहे.सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम उत्तम आहे.म्युझिक मंत्राच्या त्या सर्वेसर्वा आहेत.विविध शहरात आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या सांस्कृतिक शो करत असतात,त्याच अनुषंगाने डोंबिवली पश्चिमेकडील डोंबिवलीकरांना संगिताची मैफील अनुभवता आली.नुकताच अशोका बॅक्वेट हाॅल(ओल्ड सुंदराबाई हाॅल)दिन दयाळ क्राॅस रोड,डोंबिवली(पश्चिम)येथे म्युझिक मंत्रा प्रेझेन्टस्"सावन को आने दो"हा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला.यावेळी अभिनेता सत्यवान तावरे,समाजसेवक अरविंद सुर्वे,मानिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलेखा गटकल,जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,गणेश जनसेवा मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माळवदकर,सायन आयुर्वेद व युनानी महाविद्यालय व ॠग्णालय प्रशासनाचे सेवा निवृत्त कार्यालयीन अधिक्षक सत्यवान मुसळे,आबाजी सणस ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सणस,गणेश जनसेवा मंडळाचे सहचिटणीस अशोक लंगडे,सेंट्रल रेल्वे स्थानिय लोकाधिकार समितीचे जेष्ठ पदाधिकारी प्रमोद जोशी,संजय वगळ,साप्ताहिक क्रांतीनादचे संपादक अजय झरकर,जेष्ठ वृत्तपत्र लेखक अरुण पराडकर,व संस्थाच्या पदाधिकारी व मान्यवर प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हा शो उत्साहात संपन्न झाला.शो मधील सिंगर नितीन,धनजंय,अतुल,इंद्रनिल,शर्मिला केसरकर,नरेश,शशी,संजय,कैलास,विजकुमार,हेमलता,मनी,पौर्णिमा,सोनाली,प्रज्ञा,सुनिल दळवी,राजेंद्र व गायकांनी नवीन-जुनी गाणी सादर करुन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.या सिंगरना त्याच आवेशात कोऑडीनेटर गणेश मांजरेकर,म्युझिक अरेंजर विकी,मोनी,माईक-साऊंड एरेंजर व इतर म्युजिशयनी जोशपुर्ण साथ दिली.सर्व म्युझिशीयन व सिंगर यांच्या स्टेजवरील परफाॅरमन्स उत्तम होता.सर्व सिंगर व डान्स पार्टीसिपेट करणारे रसिक प्रेक्षक यांच्या सहभागाने"सावन को आने दो"हा शो एका उंचीवर नेऊन ठेवला गेलो,त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी ऑर्गनाझर शर्मिला केसरकर यांनी प्रमुख अतिथींना फुलाचे रोप देऊन स्वागत केले.तसेच म्युझिक मंत्राच्या डायरेक्ट-ऑर्गनाझर शर्मिला केसरकर याचा ग्लोबल मालवणी संस्थेच्यावतीने सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला."सावन को आने दो"या शो चे अॅकरींग आर जे आरती साजवान आनंदी,उत्साहीत,प्रफुल्लीतपणे शब्दसुमनांनी उत्कृष्टरित्या सादर करुन रसिकांची मने जिंकली.शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.