राज्यातील बांधकाम कामगार व असंघटित गरजू कामगार जे हक्क व सुविधा पासून वंचित आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर लढा उभारणार महाराष्ट्र राज्य कामगार संघर्ष संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विनोद चव्हाण

 




 जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख



 सध्या राज्यत बोगस बांधकाम कामगार संघटना ज्या

कामगारांची आर्थिक लुट करत आहे.त्यांना आळा बसावा व गरजु व खरे कामगार जे हक्क व सुविधा पासुन वंचित आहे.त्यांना न्याय मिळा व जे शासन दरबारी बांधकाम कामगार व असंघटित कामगार यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सुटावे या साठी. राज्य भर लढा उभारणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कामगार संघर्ष संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विनोद चव्हाण.यांनी सांगितले आहे.ते फर्दापूर येथे प्रदेश कार्यकारिणी च्या बैठकीत बोलत होते...

 आज फर्दापूर येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी च्या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष.भजनदास पवार.प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र बिडकर.राज्य सचिव .

शेषराव इंगळे.प्रसिद्ध प्रमुख शरद दामोदर. प्रवक्ता भगवानराव कदम. सहसचिव भिकन शिरसाट धुळे .कोषाध्यक्ष.सुदाम सोनवणे. सल्लागार युनूस पठाण.गौतम तेलंग.सुनील दामोदर.सचिन पाटील.हे उपस्थित होते.या बैठकीत विनोद चव्हाण यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कामगारां

च्या हक्कांसाठी मोठा लढा राज्य भर उभारण्यात येणार असून त्यासाठी मार्ग दर्शन केले.व कामगारांचे हक्क व कामगार महामंडळाने कामगारांसाठी च्या योजना व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे त्या कामगारांना कश्या मिळवून देता येतील.या बद्दल सखोल माहिती दिली.या बैठकीत त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याची कार्यकारिणी ची निवडण्यात आली आहे.

      या बैठकीला राज्य सह संघटक सचिन पवार. प्रदेश संपर्कप्रमुख.गणेश बावस्कर .प्रदेश सह संपर्कप्रमुख. अमन बेग संभाजीनगर.सहसंघटक जावेद शेख.सह संपर्कप्रमुख.संजीव  भोंडे अमरावती.सल्लागार.युनूस पठाण.गौतम तेलंग.सुनील दामोदर.सचिन पाटील.छत्रपती संभाजी नगर शहराध्यक्षपदी अमन बेग यांच्यासह राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post