चिपळूण (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
सावर्डे येथील लायन्स क्लब ऑफ सावर्डेच्या २०२४-२५ या वर्षासाठी सतीश विष्णू सावर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी व्याघ्रांबर नेहतराव तर खजिनदारपदी अजय उपरे यांची निवड करण्यात आली. लायन्स क्लब सावर्डे गेली ५ वर्ष सावर्डे पंचक्रोशीत कार्यरत असून वैद्यकीय, शिक्षण, पर्यावरण तसेच इतर विविध सेवा देण्याचे काम करत आहे. लायन्स क्लच्या कार्यकारणीच्या सभेत अध्यक्ष डॉ.निलेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवड करण्यात आली. लायन्स क्लब सावर्डे २०२३-२४ या वर्षामध्ये डिस्ट्रीक्ट तसेच मल्टीपलमध्ये बेस्ट क्लब म्हणून घोषित करण्यात आले असुन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लॅटीनम क्लब म्हणून सावर्डे क्लबने नावलौकिक मिळविलेला आहे.
नूतन अध्यक्ष सतीश सावर्डेकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. ते शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून अनेक सामाजिक संस्थांवर कार्यरत आहेत. वर्षभरामध्ये सावर्डे क्लबच्या सर्व सदस्यांना घेऊन आरोग्य व शिक्षण तसेच पर्यावरण यावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर पदाधिकारीमध्ये उपाध्यक्षपदी अरविंद भंडारी, एलसीआयएफ को.ओर्डीनेटर पदी डॉ.निलेश पाटील, क्लब ADMINISTRATOR पदी प्रकाश राजेशिर्के, सर्विस ACTIVITY कोओर्डीनेटर पदी आदिती निकम, लीडरशिप प्रमुख पदी डॉ.कृष्णकांत पाटील, मेम्बर्शीप प्रमुखपदी डॉ.रश्मी पाटील, क्लब बुलेटीन प्रमुखपदी प्राची गोखले, मार्केटिंग चेअर पर्सनपदी सीताराम कदम, पी.आर.ओ पदी मीरा पाध्ये, संचालकपदी गिरीश कोकाटे, डॉ.अमोल निकम, विजय राजेशिर्के, राजेश कोकाटे, दीपक सावर्डेकर, डॉ.अरुण पाटील तसेच टेलत्वीस्टर म्हणून डॉ.वर्षा खानविलकर आणि टेमर म्हणून डॉ.राजेश कांबळे यांची निवड करण्यात आली.