आरोग्यदायी मदतीचा हात........
Helping hand........
अमरावती : मोचरडा ता.दर्यापूर जिल्हा अमरावती येथील अत्यंत गरीब व गरजू रुग्ण नागसेन पर्वतकार हे गेल्या काही महिन्यापासून अत्यंत दुर्धर आजाराने ग्रस्त होते, आर्थिक स्थिती खालावली असल्यामुळे आजाराचा खर्च झेपावणारा नव्हता, त्यामुळे त्यांच्या परिवाराने रुग्णाची कैफियत रुग्णसेवक सोमेश्वर गावंडे यांच्याकडे मांडली. त्यांनी लगेच, गरजू रुग्णांना मदत करणारे व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्ण सेवा करणारे माननीय प्रकाश साबळे यांना याबाबत माहिती दिली.
प्रकाश साबळे यांनी त्वरित दखल घेऊन रुग्णास पंधरा दिवसांपूर्वी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे रवाना केले व याबाबत अभुदय मेघे व PRO नाना शिंगणे यांच्या विशेष सहकार्याने तसेच रुग्णालयाच्या आधार योजने अंतर्गत रुग्णाचे बॉलचे दि. 23/ 6 /2024 रोजी विनामूल्य ऑपरेशन करण्यात आले.
रुग्णाच्या परिवारास मोठा आर्थिक दिलासा मिळाला,पर्वतकार परिवाराने प्रकाश साबळे, सोमेश गावंडे व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभुदय मेघे व नाना शिंगणे यांचे आभार मानले आहे.