नेरपिंगळाई येथे भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न

 



     

भाजपा ओबीसी मोर्चा,शालीनी ताई मेघे हॉस्पिटल व जिवन आधार संस्थान नागपूर तर्फे केले होते आयोजन. 




 मोर्शी प्रतिनिधी प्रमोद घाटे/प्रविण पाचघरे नेरपिंगळाई 

     दि २२/६/२०२४ ला नेरपिंगळाई येथे भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश रविराज देशमुख मित्र परिवार व्दारा आयोजित महाराष्ट्र ग्राम दर्पण, शालीनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर,जिवण आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरपिंगळाई येथिल श्री समर्थ गुलाबपुरी महाराज कार्यालयामधे दिनांक २२/६/२०२४ शनिवारी निःशुल्क महाआरोग्य शिबिरामध्ये मेडीसीन,स्ञि रोग, अस्थिरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग,न्युराॅलाजी, शल्यचिकित्सक,नाक-कान-घसा मेंदू शस्त्रक्रिया (न्युरोसर्जन ) किडनी रोग तज्ञ, हृदय रोग अशा सर्वच आजारांच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमुने तपासणी करून औषधोपचार केले व उपलब्ध असलेल्या गरजेनुसार औषधिचे मोफत वाटप केले तसेच गरजेनुसार मोफत चष्मे वाटप करण्यात आले.




     तसेच ज्या रूग्णांना तपासणी करून अधिक तपासणी चाचण्या चि आवश्यकता आहे व आपरेशन ची आवश्यकता आहे अशा रुग्णांना आयोजकांनी दिनांक २३/६/२०२४ रविवारी पुढिल उपचारासाठी शालीनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर येथे नेऊन उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली या महाआरोग्य शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांनी आरोग्य तपासणीसाठी गर्दि केली होती व तपासणी चा लाभ घेतला शिबिरामध्ये भाजपा चे ओबीसी नेते रविराज देशमुख व मित्र परिवार तसेच भाजपा ओबीसी महिला मोर्चा पदाधिकारी वर्षा गाडगे, तसेच भारतीय जनता पार्टी चे सर्व विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.

Post a Comment

Previous Post Next Post