मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-समाजकार्याची आवड,प्रत्येक कार्यक्रमात स्वतःहून पुढे येऊन तत्परतेने काम करण्याची सुस्वभावी निस्वार्थी वृत्ती,हसतमुख प्रसंग व्यक्तीमत्व म्हणजे दिपा चंद्रकांत गांगुर्डे,कल्याण येथे वास्तव्यास असणा-या दिपा गांगुर्डे यांचा विविध सामाजिक संस्थांशी घनिष्ठ संबंध आहेत.त्या राईट्स ऑफ वुमेन फाऊंडेशनच्या संचालिका आहेत.तसेच दिपा गांगुर्डे या राईट्स ऑफ वुमेन अंतर्गत टिटवाळा येथे वंचित,गरीब,निराधार मुलांसाठी "आईची सावली बालभवन"हा अनाथ आश्रम चालवत आहेत.त्या तेथील मुलांची विनामूल्य सेवा करत आहेत.याच त्यांच्या चतुरस्त्र कामाची दखल कोकणदीप या मासिकाच्या संपादकांनी घेतली.त्याच अनुषंगाने कोकणदिप या मासिकाच्या २२व्या वर्धापनदिनी दिपा चंद्रकांत गांगुर्डे यांना मान्यवरांच्या हस्ते"महाराष्ट्र भूषण पुरस्काराने"सन्मानित करण्यात आले.हा कार्यक्रम नुकताच दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्रा.सुरेंद्र गावसकर सभागृहात संपन्न झाला.यावेळी दै.प्रहारचे संपादक डाॅ.सुकृत खांडेकर,अभिनेत्री साक्षी नाईक,कोकणदिपचे आधारस्तंभ शिवसेना संपर्क प्रमुख सुधीरभाऊ कदम,कोकणदिपचे संपादक दिलीप शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.दिपा चंद्रकांत गांगुर्डे यांना या अगोदरही विविध संस्थांनकडुन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.दिपा गांगुर्डे या सर्वांना सोबत घेऊन शैक्षणिक,सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रात कार्य करत असतात.त्यांना हा"महाराष्ट्र भूषण पुरस्कार"मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.