माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,माजी विद्यार्थी स्नेहमेळावा,आठवणींचा सुखद गारवा..!

 


माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,माजी विद्यार्थी स्नेहमेळावा,आठवणींचा सुखद गारवा..! 


मुंबई(महेश सावंत यांजकडून)-बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,तसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.कनेडी च्या माळरानावर७०वर्षापूर्वी असेच शिक्षणाचे रोपटे रुजवले.आमच्या गावातील मुलांनाही शिक्षणाची सोय मिळायला हवी,म्हणून धडपडणा-या लोकांनी तन,मन,धन अर्पून या रोपट्याला जगवल,वाढवलं आणि आता ७०वर्षानंतर या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे.याच वटवृक्षाच्या छायेत वाढलेल्या,त्याच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या,मोठ्या झालेल्या चिमण्या-पाखरांचे स्नेहसंमेलन नुकताच मराठा मंडळ,वा.ब.फडके मार्ग,केळकर काॅलेज जवळ,मुलुंड(पूर्व)येथे यशस्वीरित्या मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

हा अद्वीतीय कार्यक्रम यशस्वी झाला,पण त्यामागे अनेक लोकांचे परिश्रम,योगदान होते.त्यांचे कौतुक व्हायलाच पाहिजे.अध्यक्ष सतिश सावंत,.गणपत गुरुजी,आर.एच.सावंत सर,संस्थेचे सर्व जेष्ठ पदाधिकारी,संस्थेचे मुख्याध्यापक.दळवी सर,पर्यवेक्षक.बुराण सर,आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे कौतुक करावे तेवढे थोडके.पण त्यातही विशेष कौतुक करावेसे वाटते शिवाजीराव सावंत व भिरंवडेकर मराठा समाजातील त्यांच्या इतर सहका-यांचे.गावातून कार्यक्रमासाठी आलेल्या जवळजवळ शंभर जणांची खूप चांगली व्यवस्था त्यांनी केली होती.त्यामुळेच प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी सर्वजण आनंदी,प्रफुल्लीत,उत्साहात होते.आणखीन एक नाव विशेषकरून घ्यावे लागले ते म्हणजे भिरवंडे-जांभूळ भाटले येथील संगीतकार श्रीकृष्ण सावंत याचे,खास या कार्यक्रमासाठी त्यांनी बनविलेली गाणी एवढी सुंदर होती की त्यांनी ख-या अर्थाने कार्यक्रमाची गोड सुरुवात केली.आपल्या गावावर,रामेश्वर देवावर आणि एकूणच कोकणावर त्यांनी लिहिलेली गाणी खूपच सुंदर असतात.पण या लयबद्ध संपन्न झालेल्या कार्यक्रमात सादर केलेली गाणी त्याहूनही सुंदर वाटली.आणखीन एक विशेष कौतुक म्हणजे ही गाणी भिरवंडे गावच्या लेकी आणि सुनांनी सुंदर पध्दतीने सादर केली.त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढविली.या सर्वांच्या चेह-यावराचा आनंद,इतर सादर करणा-या मुलांसारखा होता.खरंच खूप कौतुकास्पद.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुलांनीही चांगलीच तयारी केली होती.धनगर नृत्य,लावणी नृत्य सादर करणा-या आणि बाकी सर्वच मुलांनी भरपूर तयारी केली होती,पण या कार्यक्रमाचा परमोच्यबिंदू गाठला तो शिवचरित्रावरील सादरीकरणानी.महाराजांचा प्रवेश,महाराजांची आवेश पूर्ण चाल,शिवगर्जना,हर हर महादेव च्या गर्जना यामुळे सभागृह दणाणून गेले.अंगावर रोमांच आले.प्रायोगिक रंगभूमीवर जमणार नाही एवढे सुंदर सादरीकरण होते.हे सादरीकरण करणा-यांबरोबरच याची पूर्वतयारी करुन घेणारा स्टाफ आणि मुलांची वेशभूषा,मेकअफ करणारे कलाकार यांचेही कौतुक करावे लागेल.शिंपल्यासारखी खूप कमी लोग असतात या जगात...ते दुस-यांना मोत्या सारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत...आणि सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे शाळेवर प्रेम करणारे,आपल्या कार्यक्रमातून वेळ काढून खास उपस्थित राहिलेले शाळेचे विद्यार्थी.ज्यांच्या उपस्थितीशिवाय कार्यक्रमात रंगत भरणे शक्यच नव्हते...आता या पुढचा टप्पा ही नक्कीच यशस्वी होईल,शाळेच्या नवीन इमारतीच्या उभारणी साठी सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल यात शंकाच नाही.

लवकरच शाळेची प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीने सुसज्ज वास्तू निर्माण होईल,यासाठी खूप खूप शुभेच्छा!मुलुंड येथे संपन्न झालेला दिमाखदार सोहळा आणि त्यानंतरचे फोटो पाहून,विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया वाचून खूपच छान,अगदी आनंदी मस्त वाटतय.माझी शाळा,माझा गाव,माझा समाज याबद्दलचा माझा अभिमान द्विगुणीत झाल्यासारखं वाटते.

Post a Comment

Previous Post Next Post