श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव: पांदन रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश तयार करण्यासाठी तहसीलदारांच्या नावे तीस हजाराची लाच स्वीकारताना अव्वल कारकून याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही कार्यवाही महागाव येथील तहसील कार्यालयात आज (ता.२६) सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान करण्यात आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली.प्रवीण पोहरकर असे लाचखोर लोकसेवक अव्वल कारकून कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हिवरा येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी मागील तीन वर्षापासून हिवरा येथील शेतकऱ्याचा लढा सुरू आहे.तहसील कार्यालयासमोर तीन वर्षात तीन वेळा आमरण उपोषण केले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या टॉवर वर चढून अभिनव आंदोलन करून पांदण रस्ता मोकळा करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
एवढे करूनही पांदण रस्ता मोकळा होत नसल्याने प्रजासत्ताक दिनी गावातच असलेल्या टॉवरवर चार दिवस उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.त्यावेळी मात्र प्रशासन हादरून गेल्याने रस्ता मोकळा करून देण्याच्या अश्वानावरून शेतकऱ्याने आंदोलन मागे घेतले.रस्ता मोकळा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जवाबदारी देण्यात आली होती.परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या आदेशाशिवाय पुढील कार्यवाही करता येणार नसल्याचे सांगितल्याने शेतकऱ्याने तहसीलदार यांना आदेश देण्याबाबत आग्रह केला.
त्यावेळी अव्वल कारकून याने आदेश तयार करून देण्यासाठी तहसीलदार यांच्या नावाने चाळीस हजाराची मागणी केली.पैसे देण्याची ई च्छा नसल्याने तडजोडीअंती तीस हजाराची लाच देण्याचे ठरले.शेतकऱ्याने लोकसेवक याच्याविरोधात यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने महागाव तहसील सापळा रचला.आणि शेतकऱ्याला पैशाची मागणी करणाऱ्या अव्वल कारकून लोकसेवकाला एसीपी पथकाने रंगहाथ पडले .ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी उत्तम नामवाडे, जयंत ब्राह्मणकर ,सचिन भोयर, राकेश सावसाकडे, सुरज मेश्राम, सतीश सोनुने,भागवत पाटील, पोलीस उपनिरीक्षक तथा चालक संजय कांबळे यांनी ही कार्यवाही केली.
लाचखोर लोकसेवकाने पत्रकार विरोधात केली होती खंडणीची तक्रार
मागील काही दिवसापासून वादग्रस्त असलेल्या लोकसेवकाने चार पत्रकारांविरोधात कोणताही पुरावा नसताना पैसे मागत असल्याच्या आरोपावरून महागाव पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाची खंडणीची फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एसीबीची कार्यवाही संशयास्पद
तहसीलदारांच्या नावे लाच स्वीकारताना आरोपी लोकसेवकाला एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर संबंधित तहसीलदाराला ताब्यात घेतले नाही.त्यामुळे यामध्ये मोठी उलाढाल झाल्याची चर्चा असून एसीबीची कार्यवाही संशयाच्या भवऱ्यात सापडली आहे