मोर्शी प्रतिनिधी/ प्रमोद घाटे
अप्पर वर्धा धरण ग्रस्त कृती समितीचे आंदोलन मागिल ११ महिन्यांपासून सुरू होते, यामधे वेगवेगळी आंदोलने करून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते, ज्यामधे सर्वात गाजलेले आंदोलन म्हणजे मंत्रालयाच्या जाळीवर उतरून केलेले आंदोलन होते, त्यानंतर उपोषण मंडपात च गळफास घेऊन गोपाल दहीवडे यांनी जीवन यात्रा संपवली होती, अशी बरीच आंदोलने केल्यानंतरही शासनाकडून प्रतिसाद मिळत नव्हता त्यातच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपुर्ण देशभर आदर्श आचारसंहिता लागू झाली होती तसेच जिल्हा प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन अप्पर वर्धा धरण ग्रस्त कृती समिती चे वतीने आंदोलन स्थगित करण्यात आले होते मात्र त्याच वेळी आमचा लढा असाच जोमाने सुरू ठेवू असा इशाराही त्यावेळी अप्पर वर्धा धरण ग्रस्त कृती समितीचे उमेश शहाणे यांनी दिला होता.
त्यातच भारतीय निवडणुक आयोगाने आदर्श आचारसंहिता उठवत असल्याचे जाहीर करताच पुन्हा गाव बैठका घेऊन कृति समिती कामी लागली होती, २९ ऑगस्ट २०२४ ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय १५ दिवसात मार्गी लावू असे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन तब्बल ९ महिने उलटूनही पूर्ण न केल्याने कृति समिती ने पुन्हा मुंबई मंत्रालय घेराव आंदोलन जाहीर केले होते.
पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला व कृति समितीचे शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज टरमिनान्स येथेच डांबून ठेवलं नंतर सर्व यंत्रणा कामी लागली असली तरी आश्वासन ऐके आश्वासन हाच खेळ दिसल्याने दिनांक १९ जुन २०२४ ला युवासेना जिल्हा प्रमुख व अप्पर वर्धा धरण ग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी उमेश शहाणे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव जी ठाकरे यांची त्यांच्या मुंबई स्तिथ मातोश्री निवासस्थानी भेट घेत संपुर्ण माहिती दिली. शिवसेना संपुर्ण ताकदीने अप्पर वर्धा धरण ग्रस्त शेतकर्यांचे सोबत उभी असेल अशी ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते. लगेच महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास जी दानवे यांना तसे आदेश देवून या संपुर्ण प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले, तोच संपुर्ण मागण्या चे वर्गीकरण करून टप्प्याटप्प्याने त्या सोडणुकीसाठी एकत्रित प्रयत्न करूया असा विश्र्वास श्री अंबादास जी दानवे यांनी दिला.
बऱ्याच वर्षानंतर कुणीतरी मोठा नेता आपल्या बाजूने असल्याची जाणिव संपूर्ण अप्पर वर्धा धरण ग्रस्त शेतकऱ्यांना झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले व मोर्शी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी मागणी यावेळी शेतकर्यांनी माननीय उध्दव जी ठाकरे यांना केली, यालाच सवयी प्रमाणे तात्काळ प्रश्न उपस्थित करत "निवडून द्याल का?" असा सवाल केला तर संपुर्ण शेतकर्यांनी एकदिलाने हो म्हणत उद्धव साहेबांना विश्र्वास दिला.
या बैठकी साठी युवासेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांनी पुढाकार घेतला तसेच उद्धव जी यांनी पाठ थोपटत असेच जनतेचे कामे करत राहा असा आपुलकीचा सल्ला उमेश शहाणे यांना दिला.