जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने महिला प्रदेश सचिव नंदिनीताई टारपे
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
बुलढाणा : महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र प्रदेश महिला व जिल्हाधिकारी महिला काँग्रेस कमिटी उपस्थितीत सुस्त आणि निर्दयी भाजपा युती सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले.
या चिखल फेक आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, आणि जनसामान्य माणसाच्या प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील विद्यार्थ्यांवर स्पर्धा परीक्षा, NEET, JEE, UGC परीक्षा तसेच विविध सरकारी पदांच्या परीक्षेमध्ये वाढत चाललेला सावळा गोंधळ तथा वाढता भ्रष्टाचार ही महाराष्ट्र राज्यासाठी शरमेची बाब असून, आपले भविष्य तळ हातावर घेऊन संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांवर रोज अन्याय होत आहे.
लाखो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखलात उभे करणाऱ्या, शेतकऱ्यांना मदत न देणाऱ्या तसेच उद्योगपती मित्रांना राजरोस कर्ज माफी देणाऱ्या भाजपा युती सरकार विरोधात तीव्र आंदोलन आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसने केलें, तसेच तीव्र घोषणा बाजी करत या निर्दयी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्यात आला. व शासनास निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राहुल बोंद्रे, आ. धीरज लिंगाडे, विजय अंभोरे, विनोद बेंडवाल, तेजंन्द्रसिंघ चौव्हाण, मा. स्वातीताई वाकेकर,नंदिनी टारपे,मंगला ताई पाटील, संतोष आंबेकर, दीपक रिंढे, तुळशीराम नाईक, एकनाथ चव्हाण, शैलेश खेडकर,ऋषभ साळवे आदी उपस्थित होते.