सावळदबारा परिसरातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक मुख्यालयी हजर रहा
केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती विभाग अध्यक्ष रहीम पठाण यांचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख
सोयगांव - तालुक्याच्या सावळदबारा परीसरातिल जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या अप-डाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महाराष्ट्र शासन एका जिल्हा परिषद शाळेवर लाखोंचा निधी खर्च करते आणि शासनाच्या परिपत्रकानुसार मुख्यालय राहणे अनिवार्य आहे तरीही या ठिकाणी असलेल्या सावळदबारा परीसरातिल शाळांच्या पटसंख्याचा आकडा घसरत चालला आहे. पालकांचा संस्थाकडे वाटचाल केली आहे या वर्षी तर सावळदबारा परिसरातील जिल्हा परिषद शाळेमधील बोटावर मोजणे इतके विद्यार्थी राहिले आहेत. सावळदबारा परिसरातील जि. प. ची केंद्रीय प्राथमिक शाळा पहिले ते सातवा आहे. या सर्व परिसरातील शाळांमधील केवळ एक ते दोन शिक्षक मुख्यालयी राहतात. बाहेरगावांहून ये-जा करणा-या शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षकांनी मुख्यालयी राहावे, असा शासनाचा आदेश आहे. मात्र, या शिक्षकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. एक मुख्याध्यापक सोडून दुसऱ्या जिल्ह्यातून अप डाऊन करतात त्यामुळे गावातील सरपंच व राजकीय यांचा शिक्षकांवर कुणाचाही वचक नाही. हे शिक्षक तासिकेदरम्यान मोबाइलवर संभाषण करण्यात मग्न असतात. या कारणामुळे पट संख्या घसरत चालली आहे. जे शिक्षक अप डाउन करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि जे जे शिक्षक अप-डाउन करतात गट शिक्षण अधिकारी यांनी पट संख्या कशी वाढेल यांच्याकडे लक्ष लक्ष देऊन जे शिक्षक मुख्यालयी हजर नसतात त्या शिक्षकावर व मुख्याध्यापकावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीचे खानदेश विभाग अध्यक्ष रहीम पठाण व परिसरातील पालक वर्ग करत आहे.