फर्दापूर येथे शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक २ उत्साहात साजरा

 


शाळापुर्व तयारी मेळावा क्रं 2 उत्साहात साजरा


                   जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख

     फर्दापुर - जि प कें प्रा शाळा फर्दापूर ता सोयगाव या शाळेत प्रवेशपात्र बालकांसाठी शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक 020चे आयोजन दिनांक 20/06/2024 रोजी करण्यात आले. मेळाव्यामध्ये प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी, बौद्धिक विकास,शारीरिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास, गणनपुर्व तयारी ,साहित्य वाटप व मार्गदर्शन इत्यादी टेबलवर प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. शाळा पूर्वतयारी मिळवण्यासाठी उपसरपंच फिरोजखाॅं पठाण, शेख जाकेर,भिमराव बोराडे, आरीफ शहा ,विजय घुले, शेख सादिक, अंगणवाडी सेविका ताराबाई लव्हाळे,हर्षाबाई बडोदे, मुख्याध्यापक डी टी बलांडे शाळेतील सर्व शिक्षक बंधू -भगिनी, गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post