जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवात विकास संस्थेच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षवाटप उपक्रम संपन्न.!

 


                                          


कल्याण (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवात विकास संस्था अर्थात नेफडो ठाणे जिल्हा उपाध्यक्षा मा. अनिता कळसकर यांनी आपल्या विभागात वृक्षारोपण आणि वृक्षवाटप उपक्रम आयोजित केला होता. सार्वजनिक वाचनालय आणि शिशू विकास शाळेत वृक्षवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम नेफडो च्या पदाधिकारी यांचे समवेत पार पडला. या प्रसंगी नेफडो उपाध्यक्ष मा.प्रकाश कदम सर राष्ट्रीय महिला अध्यक्षा आसिया रिजवी तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अस्मिता सावंत यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.हा कार्यक्रम कल्याण पश्चिम मध्ये पार पडला 

सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस मा.भिकू बारस्कर सरांना मधुमालती हे झाडं भेट म्हणून देण्यात आले. तसेच वाचनालयातील ग्रंथपाल गौरी देवळेकर आणि करूणा कल्याणकर. तसेच संपूर्ण महिला कर्मचारी यांना तुळशीचे रोप तसेच गुलाबपुष्प भेट म्हणून देण्यात आले. तसेच नेफडोच्या अस्मिता सावंत आणि आसिया मॅडम आणि मा.प्रकाश कदम या सर्वांचे स्वागत तुळशीचे रोप व गुलाबपुष्प देऊन अनिता कळसकर यांनी केले. ग्रंथालयातर्फे बारस्कर सरांनी वाचनालय तर्फे अशा सुंदर उपक्रम केल्याबद्दल अनिता कळसकर यांचा शाल आणि तुळस देऊन सत्कार करण्यात आला .तसेच संपूर्ण नेफडोच्या पदाधिकारी यांनी हा उपक्रम वाचनालय मध्ये राबवला यासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन शाल आणि तुळशीचे रोप देऊन अभिनंदन केले.या कार्यक्रम ला आवर्जून उपस्थिती माजी नगरसेविका सौ मीनाक्षी डोईफोडे यांनी दर्शवली. त्यानंतर दुपारचा अल्पोपहार सर्वांना देऊन शिशु विकास शाळेत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे पाटील यांनी आम्हांला शाळेत झाडे लावली म्हणून धन्यवाद व्यक्त केले.अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी वृक्ष भेट आणि वृक्षारोपण मोठया उत्साहात पार पडले.नेफडो उपाध्यक्ष प्रकाश कदम सरांनी मार्गदर्शन करून माहिती दिली तसेच मार्गदर्शन करताना सूचित केले की सध्या आपणास जोरदार पावले उचलून मोठया प्रमाणात वृक्षारोपण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आहे ती वृक्ष संपदा सुरक्षित करून नविन वृक्षा रोपण करून संख्या वाढविणे अर्थात संवर्धन करणे पुढील पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post