शिक्षक सन्मान अभियानाचे आयोजन
प्रतिनिधी/ प्रमोद घाटे: महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान संघ प्रणित शिक्षक सन्मान अभियानांतर्गत "राष्ट्रनिर्माता सन्मान सोहळा - 2024" 16 जून 2024 ला अभियंता भवन अमरावती येथे संपन्न झाला. यावेळी अमरावती जिल्ह्यातील युवा पत्रकार, विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी, निःस्वार्थपणे शिक्षण, आरोग्य शेती व रोजगार या क्षेत्रात भरीव कार्य करणारे, श्री.दिनकर सुंदरकर यांना "राज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता पत्रकारिता सन्मान 2024" शिक्षण सन्मान अभियानाच्या वतीने अमरावती जिल्हातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते गोविंदजी कासट, सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे, अध्यक्षा प्रा. सुजाता गौरखेडे, शिक्षक सन्मान अभियानाचे संस्थापक विजय धाकुलकर, राज्यकार्याध्यक्ष बापू भोयर, राज्य उपाध्यक्ष संतोष बोरकर, ठाणेदार नितीन ढाकुलकर हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील 40 उत्कृष्ट शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,प्रशासकीय सेवेत अग्रणी लोकांचा व सामाजिक संस्थांचा "राष्ट्रनिर्माता पुरस्कार 2024" देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी राज्य समन्वयक महादेव निमकर ,राज्यप्रमुख ज्ञानेश्वर सोनटक्के, तंत्रविभाग राज्यप्रमुख प्रदीप भूरसे राज्यप्रमुख शि.स.सा.मंच वैशाली मानकर,राज्य सरचिटणीस प्रा. सुजाता गौरखेडे,राज्य सहसचिव पंकज थोरात,अमरावती जिल्हाध्यक्ष देवानंद डामरे, विठोबा निंभेकर, प्रा लोढे, राजन देशमुख, गजानन इंगळे,दिनेश वानखडे, जगदीश ढोरे, अक्षय डोईजड, सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.