प्रतिनिधी- प्रविण पाचघरे
नेरपिंगळाई गावात पोलीस चौकी व नियमित वाहतूक पोलीस मिळण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश पांडे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली मागणी
नेरपिंगळाई हे गाव तिवसा मतदार संघ व मोर्शी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असून गावाच्या सुरक्षे विषयक कामकाज शिरखेड पोलीस विभागामार्फत चालतो गावात कुठेहि चोरी गंभीर प्रकार किंवा अपघात सह अन्य कुठलीही घटना घडल्यास तक्रार दाखल करण्यासाठी सात किलोमीटर शिरखेड येथे जावे लागतात.
एवढ्या मोठ्या गावामध्ये कुठला गंभीर गुन्हा होत असताना येथून सात किलोमीटर वरून पोलीस येते पर्यंत त्याला आपण सामान्य नागरिक थांबवू शकत नाही तसेच येथे पोलीस मदत केंद्र आहे.
परंतु तेथे पोलीस कर्मचारी मोजक्याच वेळेस उपलब्ध असतात. त्यात नेरपिंगलाई गाव राज्यमार्ग 300 सोबत जुळला असून हा मार्ग गावाच्या मध्यभागातून गेलेला असायन या रस्त्यावर तेलंगना आंध्रप्रदेश छ्तीसगड कडून येणारे व मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या जडवाहणाची वर्दळ नेहमीच असते त्यात गावातील रस्ता कुठे कमी कुठे जास्त असं असल्याने अनेक दुकानापुढे मिळेल तिथे टू व्हिलर पार्किंग होत असल्यानी अनेकदा वाहतुकिचा जाम सुद्धा या रस्त्यावर बघायला मिळतात त्यात वाहतुक पोलीस नसल्याने येथील स्थानिक नागरिकांना वाहतूक पोलीस च कर्त्यव्य पार पडावे लागतात व छोटी मोठी घटना घडल्यास शिरखेड पोलीस ठाणे गाठावे लागतात हि समस्या बनल्यानी गावातच पोलीस चौकी व वाहतूक पोलीस उपलब्ध करून देण्याची मागणीचे सामाजिक कार्यकर्ते निलेश पांडे यांनी पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या कडे दिले लवकर आमदार यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे खासदार यांच्या कडे सुद्धा हि समश्या मांडणार असल्याचे सांगितले..