तिवसा विधानसभेमध्ये प्रबळ दावेदारांची मोर्चे बांधणी सुरू

 




मतदारांचे लक्ष भाजपाकडे राजेश वानखडे, रविराज देशमुख, निवेदिता दिघडे, दिनकर सुंदरकर इच्छुक 


    नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या असून विधानसभेची चाहूल लागली असल्याने विविध पक्षाचे उमेदवार यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

     मात्र तिवसा विधानसभेमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे,

  लोकसभा खासदार वानखडे यांच्या विजयाच्या मागे असणाऱ्या विजयाच्या शिल्पकार एडवोकेट यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला म्हणून तीवसा मतदार संघ ओळखला जातो मात्र यशोमती ठाकूर यांच्या विरोधात सक्षम उमेदवार भारतीय जनता पार्टी शोधात आहे. भारतीय जनता पार्टीची रणनीती ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून काँग्रेसच्या उमेदवार एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्या विरुद्ध नेमका उमेदवार रिंगणात कोण असा प्रश्न सामान्य मतदारांपुढे निर्माण झालेला आहे. मागील वर्षी भाजपा शिवसेना युतीकडून राजेश वानखडे यांनी निवडणूक लढविली होती त्यांचा सामना थेट काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासोबत होता वानखेडे यांना 65657 हजार मते होती तर ठाकूर यांना 76218 हजार मते होती या सामन्यात यशोमती ठाकूर या विजयी झाल्या मात्र आता राजकीय समीकरण बिघडल्याने शिवसेनेचे राजेश वानखेडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण शिवसेनेचे 25 हजार मते महा विकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाल्यास भाजपा सेनेची अंदाजे पंचवीस मते कमी होणार आहे. तर लोकसभा निवडणुकीत तिवसा विधानसभा संघातून नवनीत राणा यांना 74 हजार 680 मते मिळाली बळवंत वानखडे यांना 85 हजार 529 मते मिळाली मात्र हे निवडणूक मोदींच्या नावाने असल्याने भाजपाला मते मिळाली मात्र विधानसभा निवडणुकीत मुद्दे, उमेदवार, सामाजिक समीकरण याला खूप महत्व असते त्यामुळे लोकसभेत मिळालेली मते विधानसभा निवडणुकीत ग्राह्य ठरवू शकत नाही.

 त्यामुळे भाजपा सर्व बाबींचा विचार करून उमेदवारी देईल असा अंदाज वर्तविल्या जातो. मात्र भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक सक्रिय झाले असून 2014 पासून रविराज देशमुख हे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहे तर भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 2014 मध्ये निवडणूक लढणार्‍या निवेदिता दिघडे यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे तर सामान्य जनतेतून कार्यकर्त्यांच्या मनातील निस्वार्थ सेवाभावी व्यक्तीमत्व उमेदवार म्हणून नांदगाव पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर सुंदरकर यांचे नाव देखील समोर येत आहे सुंदरकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक असून बालपणापासून त्यांनी संघाच्या विविध जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहे. तालूका जिल्हा पदाधिकारी होते तर भाजपाचे ओबीसी मोर्चा सरचिटणीसचा कार्यभार त्यांनी सांभाळला तिवसा विधानसभेत जनसामान्यापर्यंत त्यांचा दांडगा संपर्क आणि अतिसामान्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आहे तर लोकवार्गणीतून नागरिक त्यांना निवडणुकीत उतरविण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीच्या चार इच्छुक उमेदवारांपैकी भाजपची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर महाविकास आघाडी कडून यशोमती ठाकूर उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नसून थेट लढत भाजपा व काँग्रेसमध्ये होणार असल्याचे चित्र तिवसा विधानसभेत दिसून येत आहे मात्र यावेळी वंचित व एमआयएम यांची भूमिका सुद्धा या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र समोर आहे.

Post a Comment

Previous Post Next Post