श्रेयस संदीप भानोसे यांनी देहदान करून प्रस्थापित केला नवीन आदर्श - रवींद्र दुसाने

 



 

नाशिक प्रतिनिधी निलेश शेकोकार 

श्रेयस भानोसे गेली तीस वर्ष झोपून होता. कारण त्याचे मेंदूचे तीन मेजर ऑपरेशन बालपणी झाले होते. त्यामुळे तो पूर्णपणे आई-वडिलांवर अवलंबून होता .श्रेयसची सेवा नीट व्हावी म्हणून आई-वडिलांनी दोघांनीही त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला होता .

 संदीप भानोसे यांच्या मातोश्री सुनिता भानोसे व पिताश्री श्रीधर भानोसे या दोघांनी याआधी देहदान केले होते . त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच श्रेयशने देखील मार्गक्रमण करत , आपले देहदान केले व समाजात एक नवीन आदर्श प्रस्थापित केला असे प्रतिपादन रवींद्र दुसाने यांनी केले.

भाभा नगर येथील सामाजिक सभागृहामध्ये श्रेयस भानोसे यांची प्रार्थना सभा आयोजित केली होती. मानवता हेल्थ फाउंडेशन चे अध्यक्ष रवींद्र दुसाने यांनी देहदानाचे आजच्या काळात महत्व यावर अतिशय सुरेख असे मार्गदर्शन केले.

गरुड झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संदीप भानोसे यांनी श्रेयस भानोसे यांचा तीस वर्षाचा जीवन संघर्ष आपल्या मनोगतात अभिव्यक्त केला. निर्मल ग्राम निर्माण केंद्राचे श्रीकांत नार्वेकर ,एफ डी सी चे आयुक्त दुष्यंत भामरे ,एच एल चे निवृत्त अधिकारी थोरात साहेब ,सिने कलावंत व दिग्दर्शक विशाल पाटील , विवेकानंद वृक्ष मंदिराचे संजय पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 सागर बोडके या अंध जागतिक विक्रमवीरांनी देखील सर्वांना नेत्रदान करण्याचे आव्हान केले.

अंजना प्रधान, सोहरा वैद्य, यश साबळे, चंद्रकांत नाईक, अरुण कुलकर्णी, मनोहर उपासनी ,अविनाश तरटे, रेणू भानोसे, संगीता भानोसे, सोनाली चंद्रात्रे ,संजीव रत्नपारखी, रॉयल रायडर्स चे राजीव रूपवते, संकेत भानोसे व इतर अनेक जण प्रार्थना सभेला उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post