अतनूर / प्रतिनिधी : जन्मापासूनच ते मृत्यूपर्यंत घर संसारातील दैनंदिन दळणवळण सह उपजीविका भागविण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी तसेच घरातील अठरा विश्व दारिद्र्य तुन कष्टाने, परिश्रमपूर्वक व मेहनतीने मोलमजुरी करीत आपली उपजीविका भागविण्यासाठी दैनंदिन मोलमजुरी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात धसकट वेचणी, कडबा, केरकचरा वेचणी व झाडांचा पाला पाचोळा, काळयामातीरानात वेचणी करण्यासाठी गेलेल्या अतनूर-गव्हाण येथील महादाबाई गणेश उडते रा.गव्हाण ता.जळकोट या महिलेचा मृगाच्या नक्षत्रात आभाळातून कोसळणाऱ्या मुसळधार पाऊस व विजेच्या गडगडाटासह, कडकडाटासह पडणाऱ्या विजेने झाडाखाली थांबलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१३ ) रोजी अंदाजे दुपार नंतर ४ वाजण्याच्या सुमारास अतनूर-गव्हाण-बाराहाळी मार्गावरील गव्हाण गावातील रामहनुमान, महादेव मंदिराजवळील शेतात घडली.
पोलिस पाटील रावसाहेब जाधव-पाटील, अतनूर-गव्हाण सज्जाचे तलाठी अतिक शेख यांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार महादाबाई गणेश उडते (वय ५५, रा. गव्हाण ता.जळकोट ) ह्या मोलमजूरदार म्हणून गावातील एका शेतकरी यांच्या शेतात कामे सुरू असल्याने महिला मजूर म्हणून गावातील ईतर महिलांसोबत त्यापण मजुरीवर शेतात गेल्या होत्या. महादाबाई गणेश उडते हयासुद्धा त्याचा समवेत शेतात गेली होती. वातावरण ढगाळ होते मात्र सकाळपासूनच पावसाने उघडीप दिली होती. दुपारनंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह विजा चमकण्यास सुरुवात झाली. काही कळण्याच्या आत एक जोरदार आवाज होऊन वीज महादाबाई हिच्या अंगावर पडली. ही वार्ता कुटुंबीयांनी मिळाली. पण त्या जागेवरच गतप्राण झाल्या होत्या. आपला दैनंदिन घर प्रपंच संसार चालावा याकरिता त्या मोलमजुरी करीत असत. आज शेतात गेली असताना अचानक वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर जळकोटच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेखा स्वामी, जळकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे व बीट अंमलदार श्रीधर गुडाप्पे, अतनूर-गव्हाण सज्जा चे तलाठी अतिक शेख यांना देण्यात आली आहे. महादाबाई उडते यांच्या पश्चात पती, ३ मुले, १ मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पश्चात गणेश भीमराव उडते हे वय ७० वर्षांचे वयोवृद्ध असून त्यांची येणाऱ्या काळात दैनंदिन उपजीविका, आरोग्यांच्या विविध निर्माण होणाऱ्या समस्यांना ते कशाप्रकारे तोंड देतील त्याबद्दलही हःळहळ व्यक्त होत आहे. केंद्र व राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने, महसूल प्रशासनाने तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी व गणेश भिमराव उडते यांना वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक योजना चा जळकोटच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी विनाअट त्यांचा अर्ज मंजूर करून महिन्याकाठी मिळणारे आर्थिक सहाय्य अनुदान त्वरित द्यावे.
अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या लातूर जिल्हाअध्यक्षा तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन, माजी जिल्हापरिषद सदस्या शीलाताई अजितराव पाटील गव्हाणकर, जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष पाटील राजूरकर गव्हाणकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य बी.जी.शिंदे-पाटील अतनूरकर, गव्हाण ता.जळकोटचे सरपंच बालाजी गुडसुरे, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, यांनी जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे यांच्याकडे केली आहे.