डाक अदालतीचे आयोजन

 





वर्धा,  : भारतीय डाक विभागाच्यावतीने दि.28 जुन रोजी अधिक्षक डाकघर, वर्धा यांच्या कार्यालयामध्ये सकाळी 11.30 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारीचे सहा आठवडयाचे आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीची या डाक अदालतमध्ये दखल घेतल्या जाईल. विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, कांऊटर सेवा, डाक वस्तू , पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर संबंधिच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहे.  

 तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलसह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधिक्षक डाकघर, वर्धा यांच्या नावे दि.24 जुन पर्यंत पोहोचेल अशा बेताने पाठवावी, त्यांनतर आलेल्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही. तक्रारकर्त्यांना डाक अदालतसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल, असे अधिक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post