दुचाकी वाहनांच्या धडकेत तीन ठार.. तेल्हारा-बेलखेड रस्त्यावरील घटना
अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा-बेलखेड रोडवर आज दिनांक १९ मे रोजी दोन मोटारसायकल वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पंचगव्हाण येथील रहिवासी तळेगाव बाजार येथून आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम.एच.३० ए.यु ७४१९ ने तेल्हाऱ्याकडे येत होते.
तसेच दुसऱ्या मोटारसायकल ने आकाश निंबोकार हा तेल्हाऱ्याकडून बेलखेड कडे जात होता. त्या दरम्यान या दोन्ही दुचाकी (मोटारायकलची) समोरासमोर धडक झाली.
या धडकेमध्ये तीन लोकांनी जागेवरच आपले प्राण गमावे लागले आहे. आशिक खान कुदरत खान वय (३५), मुलगी अम्मारा खातून वय (८), मुलगी बुशरा खातून वय (६) अशे या अपघातातील मृतकांची नावे आहेत.
या अपघातात ४ महिन्याची मुलगी व पत्नी सुमय्या खातून आशिक खान ही गंभीर जखमी झाली आहे. जिल्ह्यात अपघातामध्ये वाढ झाली आहे.
पोलीस प्रशासन व प्रादेशिक परिवहन कुठं तरी आपल्या कर्तव्यावर विसर पाळत आहे. दुचाकी वाहनावर विना हेल्मेट, डबल सिट, टिबल सिट, काही बहाद्दर तर दारू पिऊन उघडपणे प्रवास करीत आहेत.
ज्यामुळे अपघाताचे वाढ झाली असावी असी नागरिकांध्ये चर्चा सुरू आहे.