भूमीहीन केल्या चा आरोप
मोर्शी : मौजा शिरलस सर्वे नं१२६/३येथील राजेंद्र भोपळे यांची शेती वारस हक्काने आमचे वडील भिमराव भोपळे यांना आली असुन त्यात चार भाऊ असुन सदरर्हु शेतीची आपसी वाटणी पत्र झालेले असून आजच आम्ही भूमीहीन झालेलो आहोत तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला भूमीहीन करण्याचा अधिकार कोणालाही नाही. आमची शेती कूठेही नाही मला भुमीहीन करण्याचा कोण्या कायद्याने अधिकार दिलेला आहे ते खुलासा करून सांगावा,आमची संमत्ती नाही आणि चोरून खरेदी केलेली आहे, असे आम्हाला दिसले करीता आम्ही भूमीहीन झालेलो आहोत तरी वरील सर्व प्रकरणाची ऊचीत चौकशी करून दोषींवर कारवाई करून आम्हाला न्याय देण्यात यावा यासाठी राजेंद्र भिमराव भोपळे नेरपिंगळाई यांनी तहसीलदार मोर्शी, मंडल अधिकारी, पटवारी शिरलस यांना निवेदन देवून मौजा शिरलस सर्वे नं १२६/३ चा फेरफार रद्द करण्याची मागणी केलेली आहे.